Monday, October 13, 2008

प. पू. श्रीदत्तमहाराजांचा उपदेश

प. पू. श्रीदत्तमहाराजांचा उपदेश

संसारात / व्यवहारात समाधानी असणे चांगले. पण या परमार्थात असमाधान शेवटपर्यंत राहाणे चांगले. श्रीगुरुचारित्रात गोष्ट आहे. दीपक गुरुंची सेवा करीत असतो. त्याला वाटते की में में करतोय ती गुरुंची सेवा कमीच आहे.

आपण जे पाहतो ते खरे आकाश नाहीच. खरी पंचमहाभूते फार सूक्ष्म आहेत. आणि ध्यान धारणेच्या अभ्यासाने आपली बुद्धि सूक्ष्म झाल्याशिवाय त्यांचे खरे स्वरुप समजणार नाही.

दीपकाने देवाकडे काय मागितले, ते किती महत्त्वाचे आहे.

एकाग्रतेचा / ध्यानाचा अभ्यास झाला म्हणजे बुद्धी सुक्ष्म होते आणि मग त्या बुद्धीला अनाकलनीय असा कोणताच विषय राहत नाही. मन एकाग्र केले की तत्क्षणी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होऊ शकते.
ही मनाची एकाग्रता साधनेचा अभ्यास करूनही साधते. शिवाय एरव्हीसुद्धा ध्यानधारणेचा अभ्यास चालू ठेवावा. आपल्या मनाची स्थिरता जास्तीत जास्त साधणे महत्त्वाचे आहे. नुसती प्रवचनेवाचून किंवा ऐकून काय उपयोग? त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे.

आपल्या साधकावस्थेत काहीच बदल झाला नाही आपण हे कोण ठरवणार? असे म्हणणे म्हणजे आपल्यालाही काहीतरी समजायला लागले असे म्हणावे लागेल. आपल्यात काही फरक पडलाय की नाही हे सद्गुरु ठरवतील.

पण त्याचबरोबर आपल्या वासना इच्छा कमी कमी होताहेत की नाही हे आपण जरुर तपासून पहावे. तेवढे आपल्याला समजते. आपल्या हातून जर कर्मानुष्ठान व्यवस्थित घडत असेल तर फरक पडलेला आपल्याला जाणवतो.

आपल्या हातून काहीच पुण्यकर्म घडत नाही हे म्हणणे चुकीचे तसेच फक्त मीच अमुक, तमुक करू शकतो, दुसरे कोणीही तसे करू शकणार नाही हेही म्हणणे चुकीचे आहे. आपल्याला पुण्यकर्म करत राहण्याची बुद्धी होणे ही कृपा काय कमी आहे? असे किती तरी लोक आहेत की ज्यांना जरा देखिल पुण्यकर्म करावेसे वाटत नाही.

प्रापंचिक/ व्यवहारिक/ सामाजिक व्याप कमी कमी करीत आणुन तो वेळ जास्तीत जास्त साधनेला देता येतो. आपली झोप कमी होत नाही म्हणुन अडून बसण्याचे कारण नाही. नोकरी धंदा करणार्या माणसाना एकदम तहान भूक कमी करून कसे चालेल ?

शास्त्रवचनान्वर विश्वास ठेवून शेवटपर्यंत राहाणे महत्त्वाचे. मोठे महाराज शेवटपर्यंत स्नान, संध्या कर्मे करत असत. नामस्मरण, देवांची / गुरुंची सेवा/ नवविधा पैकी कोणती तरी भक्ती सतत व्हायला पाहिजे. मनोभंग/ वासना क्षय होणे महत्त्वाचे.

साधने व्यतिरिक्त आपले चित्त जास्तीत जास्त आत्मानात्म विचार/ चिंतन/ सद्ग्रंथ वाचन यांकडे लावले पाहिजे जेणे करून आपले लक्ष संसारापासून दूर होईल. साधनेत आत्मानात्म विचार सद्गुरुकृपा असेल तर आपोआप येतात आणि तो अभ्यास होतो नाहीतर आपण स्वतः ते तत्त्वविचार आठवून त्यांचे चिन्तन करावे.

सद्गुरुनी उपदेश केला, मार्गदर्शन मिळाले तर साधकाची प्रगती लवकर होते.

1 comment:

सद्गुरुकृपाकांक्षित said...

Oh! Lord!! thank you very much for this..

This really helps someone who tries to search but is confused by nature...

This helps to such who know who they are...who they wants to be...

Gurudev Datt,
Rahul.